प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 9, 2018

प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप


प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप 
माणदेश न्यूज नेटवर्क : करंजे  ता.  खानापुर येथील जी. के. माने हायस्कूल मध्ये जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी केंद्रीयमंत्री प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जय मल्हार फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी दहावी व बारावीनंतर करियर मार्गदर्शन केले. शाखेचे माजी विद्यार्थी अर्जुन रास्ते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग विजय माने,तानाजी माने, राजेंद्र माने व गावकरी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment

Advertise