बदलत्या काळातील आदर्शाचा दीपस्तंभ म्हणजे'अहिल्या'-चंदू शिकलगार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 9, 2018

बदलत्या काळातील आदर्शाचा दीपस्तंभ म्हणजे'अहिल्या'-चंदू शिकलगार

बदलत्या काळातील आदर्शाचा दीपस्तंभ म्हणजे'अहिल्या'-चंदू शिकलगार
माणदेश न्यूज नेटवर्क :  इतिहासाला अहिल्यादेवींच्या जीवनचरित्राने अर्थ प्राप्त करून दिला. जगातील आदर्श राज्यकर्ती म्हणून मान्यता असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर म्हणजे उत्कृष्ट प्रशासनाचा आदर्श दाखला आहे. कर्तव्य आणि अध्यात्म यांच्या कठोर अमलबजावणीने अहिल्यादेवींना बहुजनांची माता असे गणले जाऊ लागले. बदलत्या काळातील आदर्शाचा दीपस्तंभ म्हणजे अहिल्यादेवी होळकर असल्याचे मत चंदू शिकलगार यांनी व्यक्त केले. ते विरकरवाडी (ता. माण) येथील अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या ,न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी पांढरे होते.
प्रारंभी ललिता बाड यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणातून अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती सांगितली. अहिल्या संस्थेच्या विविध शाखातून अहिल्या पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात आला. शिक्षक भाषणातून अहिल्या जीवनपट कथन करण्यात आला.मुलांनी अहिल्या देवीच्या जीवनाविषयी घोषवाक्ये सादर केली.
यावेळी मुख्याद्यापक शंकर वीरकर, आर.टी. काळेल, आर.बी.लुबाळ, ललिता बाड, दीपक जावीर, दादासो माने, महादेव झपाटे, नवनाथ वीरकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन के.एस.पाटील यांनी तर आभार दिपक जावीर यांनी मानले.
No comments:

Post a Comment

Advertise