डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त खरसुंडीत अभिवादन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 24, 2018

डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त खरसुंडीत अभिवादन

डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त खरसुंडीत अभिवादन 
 माणदेश न्यूज नेटवर्क/मनोज कांबळे : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ विद्यालय व कला, वाणिज्य, विज्ञान (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा  प्रतिमेचे पूजन दक्षिण विभाग सल्लागार विलासनाना शिंदे, मुख्याध्यापक रंगराव जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमोद पाटील, राहुल गुरव, धनंजय पुजारी व स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित होते. 
त्यानंतर शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. अग्रभागी पारंपारीक वेशभुषा परिधान केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग असणारे  झांज व  जिद्द अकॅडमीचे लेझीम पथक सामील झाले होते. यावेळी सजवलेल्या रथामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रातील काही घटना नाटक स्वरुपात सादर करण्यात आल्या. गावांमध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केले .संपूर्ण गावामध्ये ही शोभायात्रा फिरून आल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.


No comments:

Post a Comment

Advertise