मांडवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 24, 2018

मांडवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मांडवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
माणदेश न्यूज नेटवर्क/दत्ता ढोबळे : माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यकारणीच्या निवडी नुकत्याच अकलुज येथे संपन्न झाल्या. यावेळी मांडवे गावातुन माळशिरस विधानसभा मतदासंघाच्या तालुका उपाध्यक्षपदी बबनराव गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपदी  अरविंद आण्णा भोसले, कार्यकारणी सदस्यपदी माजी सरपंच तानाजी पालवे व राहुल दुधाळ यांच्या निवडी जाहीर झाल्या. त्यानिमित्त मांडवे गावामध्ये अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा.तंटामुक्ती अध्यक्ष कुमार पाटील, ग्रा.सदस्य शिवाजी पालवे,दिपक माने-देशमुख,दयाराम पाटील,दिपक पाटील,अॅड.पांडुरंग पालवे,सागर रूपनवर,सुरेश सुळ,अमर शिंदे,गुणवंत ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय ढोबळे यांनी केले. तर आभार तात्याबा ढोबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise