वरकुटे प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 23, 2018

वरकुटे प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न

वरकुटे प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न
ग्रामीण विद्यार्थ्यांचे नवोदय,शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदीपक यश
माणदेश न्यूज नेटवर्क
वरकुटे-मलवडी
वरकुटे-मलवडी येथील प्राथमिक शाळेची श्रुतीश्री अनिल लांडगे हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याबरोबरच सर्वसाधारण प्रवर्गातून तिसरा क्रमांक पटकावला. अंजली विलास जाधव ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाली. शिवाय जिल्हास्तरीय पोवाडा, प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना हजारो रूपयांची बक्षीसे शासनाकडून प्राप्त झाली आणि या अलौकिक यशाबद्दल खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांचेकडून शाळा,शिक्षक,पालक यांचे कौतुक करणारे पत्र प्राप्त झाले.
या पार्श्वभूमीवर'गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा' नुकताच वरकुटे-मलवडी प्राथमिक शाळेत संपन्न झाला. यावेळी लोकनियुक्त सरपंच बाळकृष्ण जगताप, विस्तार अधिकारी संगिता गायकवाड, केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बाबासाहेब मंडले,मा.सरपंच जयसिंग नरळे,मा.सरपंच बापुसाहेब बनसोडे, सेवानिवृत्त जाधव गुरुजी,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रेया अशोक केंगार,ऋतुजा जितेंद्र लोखंडे, अंकिता चंद्रकांत नरळे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, चित्रकला स्पर्धेत यश मिळवणारे सुमित बनसोडे,आल्फिया तांबोळी,अनुश्री बनसोडे,अनुष्का धावड,पायल केंगार तालुकास्तरावर प्रश्नमंजुषेत यश मिळवणारे कोमल मिसाळ,विजय नरळे,प्राची जाधव तसेच जिल्हास्तरीय पोवाडा स्पर्धेत सुमित यादव,विजय नरळे,प्रवीण तोरणे, संकेत आटपाडकर,शंतनू चव्हाण,महेश केंगार,विनय काळेल, सुमित बनसोडेया सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देवून सत्कार करण्यात आला.
शिक्षणविस्तार अधिकारी सौ. संगिता गायकवाड यांनी गेल्या पाच वर्षात शाळेतील किरण मिसाळ हिच्या नवोदय निवडीपासून ते अतिशय यशस्वी पार पडलेल्या वार्षिक  स्नेहसंमेलनाचा तसेच विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला. शाळेकडे अपुऱ्या सुविधा असूनही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांचे,उपक्रमांचे व विद्यार्थी,पालक,व्यवस्थापन समिती व विशेषकरून सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी शाळेसाठी केलेल्या सहकार्याचे मन:पुर्वक कौतुक केले. केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर यांनी अध्यक्ष बाबासाहेब मंडले व विद्यार्थ्यांच्या यशामागील  शिक्षकांच्या कष्टाचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  एम.डी. चंदनशिवे तर आभार विनोद आटपाडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मंगलाताई सरक,मिलन कोरडे, युवराज ढेरे, दत्तात्रय डफळ,संगिता जाधव,उषा गुजर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise