Type Here to Get Search Results !

“तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल, याबाबतचं आमचं आकलन चुकलं” : देवेंद्र फडणवीस




“तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल, याबाबतचं आमचं आकलन चुकलं” : देवेंद्र फडणवीस



मुंबई : विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजपा 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



"तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं" असं देखील फडणवीस म्हणाले. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज









टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
भाजपानो तुमच्यामध्ये "राम" व त्याचे कळस मांजरासारखे आडवे आले.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies