Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 



लॉकडाऊनला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली : राज्य शासनाकडील दि. 29 ऑक्टोबर 2020 च्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाकडील दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजीच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती. राज्य शासनाकडील दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये त्यांच्याकडील दि. 30 सप्टेंबर 2020 व 14 ऑक्टोबर 2020 च्या आदेशाना दि. 31 डिसेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 1 व 15 ऑक्टोबर 2020 रोजी जारी केलेल्या आदेशांना दि. 31 डिसेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


या व्यतिरिक्त एखाद्या आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया / बाबी कायम राहतील. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर इत्यादी बंधने पाळणे आवश्यक आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies