Type Here to Get Search Results !

तर ठरल.... हे आमदार यापुढे सत्कार स्विकारणार नाहीत ; तर मग काय स्विकारणार? वाचा बातमी सविस्तर



तर ठरल.... हे आमदार यापुढे सत्कार स्विकारणार नाहीत ; तर मग काय स्विकारणार? वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : राज्यांमध्ये मोठ्या संख्येने गरजू विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना मदत म्हणून पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यापुढे सत्कार न स्वीकारता त्याबदल्यात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय हा भविष्यात सर्व आमदारांनी राबविल्यास गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. /span>


देशामध्ये तसेच राज्यात अनेक गरजू व गरीब विद्यार्थी मोठ्या संख्येने असून शालेयपयोगी साहित्य नसल्याने त्यांना पुढील शिक्षणात मोठी अडचण निर्माण होते. राज्यामध्ये अनेक समाजसेवी संस्था काम करत असून त्या या गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असतात. परंतु त्यांची ही मदत काहीशा प्रमाणात तोकडी व अपुरी पडत असल्याने याचा परिणाम म्हणजे अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहेत.


परंतु आता यावर लोकप्रतिनिधी या नात्याने राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापुढे सत्कार ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे सध्या तरी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे आमदार निलेश लंके यांच्या या निर्णयाप्रमाणे राज्यातील सर्व आमदार-खासदारांनी जर असा निर्णय घेतला तर राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार असून त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. त्यामुळे आमदार निलेश लंके यांचा या निर्णय मोठा बदल घडवू शकतो.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies