Type Here to Get Search Results !

कोरोना व्हॅक्सिन डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी देण्यात देणार : आरोग्यमंत्री




कोरोना व्हॅक्सिन डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी देण्यात देणार : आरोग्यमंत्री




जालना : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वसामान्यांसह सर्वजण कोरोना लसीची वाट पाहत आहेत. कोरोना लस लवकर यावी ही आशा, व्हॅक्सिन देण्यासाठी नियोजन सुरु आहे. पोलीस,डॉक्टर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना सर्वात आधी डॉक्टर्स, पोलिसांसोबत वृद्ध नागरिकांना कोरोनाची लस देणार आहोत. सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 





कोरोना व्हॅक्सिन लवकर येण्याबाबत आशा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यात येईल आणि तसे नियोजन सध्या सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.





केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून आणि केंद्र सरकारच्या प्रोटोकॉल नुसारच कोरोना व्हॅक्सिन देण्यात येईल, असेही टोपे म्हणाले. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यासंदर्भात कोणतीही मागणी नाही, असेही टोपे म्हणाले.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
टोपे साहेब ख-या अर्थानं तुम्ही पंतप्धान व्हायला हवं. माझा इतर मंत्र्यांना शाप आहे की, पाय खोडून मराल, कोरोनांनं जनता तडफडतेय, तुम्ही मंत्री लोक एकमेकाची उणी दुणी काढत बसलात.तुमची बायका पोरं उपाशी मरोत, फक्त पैसा पैसा करुन मराल.जनता आहे तर तुम्ही आहे, अगोदर जनतेची काळजी घ्या, मग राजकारण आहे स्वार्थापोटी विजय मल्ल्या, ललित मोदींचे हात बळकट केलेत, आत्ता सप्राचे किती पापं करणार आहात.तुमच्या करणीनं जग डूबणार आणि आमचे फुकटचे बारा वाजणार.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies