Type Here to Get Search Results !

सावधान : डाबर, पतंजलीसह अनेक बड्या कंपन्यांच्या मधात भेसळ




 सावधान : डाबर, पतंजलीसह  अनेक बड्या कंपन्यांच्या मधात भेसळ 


नवी दिल्ली : भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्म असलेल्या मधाचा वापर केला जातो. मधमाशीपासून, फूलांच्या रसापासून तयार होणारा हा द्रव पदार्थ असल्याने त्याला अतिशय शुद्ध मानलं जातं. परंतु आता मधात अतिशय मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून यात चीनचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सेंटर फॉर सायन्स अँड एनवॉयरनमेंट अर्थात CSE ने खुलासा केला आहे.



सीएसईने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख ब्रँडमध्ये मोठी भेसळ करण्यात येत आहे. या भेसळीत डाबर, पतंजली, झंडु, बैद्यनाथ अशा बड्या कंपन्यांचं नावही सामिल आहे. सीएसईनुसार, बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या मधात शुगर सीरपची भेसळ केली जाते, जी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.



CSE च्या महासंचालक सुनिता नारायण यांनी सांगितलं की, मधासंबंधीचा हा रिपोर्ट भारत आणि जर्मनीच्या प्रयोगशाळेत झालेल्या एका अध्ययनावर आधारित आहे. त्यानंतर CSE नेही यासंबंधी तपास केला असता असं आढळलं की, भारतातील सर्व प्रमुख ब्रँडच्या मधात अतिशय मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. यादरम्यान 77 टक्के नमून्यांमध्ये शुगर सीरपची भेसळ आढळली. या शुगर सीरपचा सप्लाय चीनची कंपनी अलीबाबा करत असल्याची माहिती आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
ह्यात नवीन काय आहे ,आपला चायवाला भेसळयुक्त आहेत,अगोदर त्यांची भेसळ थांबवा.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies