Type Here to Get Search Results !

“आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर...”, : भाजप आमदारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा




 “आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर...”,  : भाजप आमदारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा 





मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती. त्यावरूनही भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं. याचदरम्यान आता भाजपाने शिवसेनेला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.





शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल,' असं सकपाळ यांनी सांगितलं. सकपाळ यांच्या या भूमिकेनंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 






नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे. नाहीतर "हो मी नामर्द आहे'' असं तरी सांगा, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
हंडग्यानं बाता मारु नयेत असा निर्गाचा नियम आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies