Type Here to Get Search Results !

संस्थेत ११०० कोटीचा घोटाळा ; माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट




 संस्थेत ११०० कोटीचा घोटाळा ; माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट





मुंबई : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेत ११०० कोटीचा घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. या घोटाळ्यात मोठ्या लोकांची नावे आहे. यावेळी त्यांनी संस्थेची पुणे, जळगाव, जामनेर व इतर ठिकाणची मालमत्ता मातीमोल भावात विकल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश २०१८ मध्ये केंद्र सरकारने दिले होते. पण, त्याची चौकशी वरीष्ठ पातळीवर दडपण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.





बीएसआर संस्थेवर दोन दिवसापूर्वीच पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ जणांच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकले. त्यानंतर अपहार, गुंतवणूकदारांची थकीत न देणे व संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे प्रकरणी गुन्हा दाखल करुन कागदपत्र ताब्यात घेतले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जळगाव येथे माजी मंत्री एकनाथ खडसे व अॅड. किर्ती पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली. पोलिस याची संपूर्ण चौकशी करत आहे. त्यातून मोठी नावे बाहेर येतील असेही त्यांनी सांगितले. ठेवीदाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करु, या प्रकरणात अनेकांनी हात धुऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
ह्यालाच म्हणतात मतलबी जीवन, सद्या जग टांगणीला लागलयं अन् ही मंडळी एकमेकांची उणी दुणी काढण्यात मग्न झालीयेत. ज्या जनतेच्या जोरावर निवडून येता, त्यांची काळजी करा, कोरोना लवकरात लवकर संपुष्ठात कधी येईल हे पहा. जनताच नष्ट झाल्यावर बंबूरा हाती राहिल, जरा शुध्दीवर या.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies