पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 3, 2020

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीसांगली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुक कार्यक्रमानुसार पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी दि. 2 नोव्हेंबर 2020 पासून आचारसंहिता लागू केली असून मतदान दिनांक 1 डिसेंबर तर मतमोजणी दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.


 महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील पदवीधर/शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे सदस्य चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील (महाराष्ट्र विधानसभेवर दि. 24 ऑक्टोबर 2019 रोजी निवड झाली आहे) तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे सदस्य दत्तात्रय अच्चुतराव सावंत या सदस्यांची मुदत दि. 19 जुलै 2020 रोजी समाप्त झाली आहे. या रिक्त  झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषीत केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.


निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 नोव्हेंबर 2020 (गुरूवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 12 नोव्हेंबर 2020 (गुरूवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी 13 नोव्हेंबर 2020 (शुक्रवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2020 (मंगळवार), मतदानाचा दिनांक 1 डिसेंबर 2020 (मंगळवार), मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक 3 डिसेंबर 2020 (गुरूवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 7 डिसेंबर 2020 (सोमवार) असून या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त काम पाहणार आहेत.सांगली जिल्ह्यात पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 143 मतदान केंद्रे तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 48 मतदान केंद्रे निश्चित करून निवडणूक आयोगाकडे माहिती पाठविण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 85 हजार 757 तर शिक्षक मतदारसंघासाठी 6 हजार 530 इतके मतदार आहेत. या निवडणुकीसाठी कोविड-19 विषयी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise