भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या नातीचा फटाके भाजल्याने मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 17, 2020

भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या नातीचा फटाके भाजल्याने मृत्यू भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या नातीचा फटाके भाजल्याने मृत्यूनवी दिल्ली :  उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रीता बहुगुणा जोशी या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. 
जोशी यांच्या नातीला मंगळवारी सकाळीच एअर अॅ्म्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. फटक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना त्यामुळे असणारा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी फटाक्यांची विक्री होत आहे. Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


1 comment:

  1. अतिशय दुर्दैवी तसेच मागासलेसा प्रसार. मन खिन्न झाले.

    ReplyDelete

Advertise