काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम : 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा मोहिमेत सहभाग - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 17, 2020

काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम : 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा मोहिमेत सहभाग
 काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम : 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा मोहिमेत सहभागसांगली : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून विरोध होतोय. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम राबवली गेली. या मोहिमेत 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करुन या मोहिमेत सहभाग नोंदवला. अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्याचे निश्चित केले होते. 2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या महामेळाव्यात राज्यातील 10 हजार गावं आणि खेड्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. तसेच सह्यांची मोहीमही राबवण्यात आली,” असं थोरात म्हणाले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise