IPL 2020 : SRH vs RR : निम्मा संघ ७८ धावात गारद तरीही राजस्थानने सामना ५ विकेटने जिंकला - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 11, 2020

IPL 2020 : SRH vs RR : निम्मा संघ ७८ धावात गारद तरीही राजस्थानने सामना ५ विकेटने जिंकलाIPL 2020 : SRH vs RR : निम्मा संघ ७८ धावात गारद तरीही राजस्थानने सामना ५ विकेटने जिंकला


दुबई : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स  यांच्यातल्या सामन्यात RR च्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली असली तरी राहुल टेवाटिया व रियान पराग यांनी राजस्थानला अशक्य प्राय वाटणारा विजय मिळवून दिला.  


सनरायझर्स हैदराबाद चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉनी बेअरस्टो फटकेबाजी करत असतानाच कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर संजू सॅमसननं त्याचा झेल घेत RR ला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. १५ व्या षटकात जोफ्रा आर्चरनं ७३ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. आर्चरने ३ षटकांत केवळ ६ धावा देताना वॉर्नरची महत्त्वाची विकेट घेतली. ४८ धावांवर वॉर्नरला त्यानं त्रिफळाचीत केलं. त्यानंतर मनीषचे वादळ घोंगावले. मनीषनं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मनीषला ५४ धावांवर जयदेव उनाडकटनं माघारी पाठवले. पहिल्या तीन षटकांत केवळ ६ धावा देणाऱ्या आर्चरच्या अखेरच्या षटकात केन विलियम्सननं दोन खणखणीत षटकार खेचून १९ धावा चोपल्या. अखेरच्या षटकांत हैदराबादनं कमबॅक करताना ४ बाद १५८ समाधानकारक पल्ला गाठला.


प्रत्युत्तरात जोस बटलरसह बेन स्टोक्स सलामीला आला स्टोक्सनं पहिल्या षटकात चौकार खेचून आक्रमक पवित्रा असल्याचे दाखवले. पण, पुढच्याच षटकात SRH चा कर्णधार वॉर्नरनं खलील अहमदला गोलंदाजीला आणले आणि त्यानं स्टोक्सला बाद केले. त्यानंतर स्मिथ ( ५, धावबाद) आणि बटलर ( १६) माघारी परतल्यानं राजस्थान अडचणीत सापडले. रॉबिन उथप्पाला रशीद खाननं त्याला (१८) पायचीत केलं. संजू सॅमसनलाही त्यानंच बाद केलं आणि RR चा निम्मा संघ ७८ धावांत माघारी परतला होता.


राहुल टेवाटिया आणि रियान पराग यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RR ला शर्यतीत कायम राखले होते. अखेरच्या १८ चेंडूंत विजयासाठी ३६ धावांची गरज असताना टेवाटियानं रशीद खानच्या एका षटकात १४ धावा चोपल्या. नटराजननं टाकलेल्या १९व्या षटकातही १४ धावा चोपून ६ चेंडूंत ८ धावा असा सामना फिरवला. राहुलनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ४५ धावा केल्या, तर परागनं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह नाबाद ४२ धावा करून RRला पाच विकेट्सनं विजय मिळवून दिला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise