Type Here to Get Search Results !

खासदार,आमदार दापत्यांचा विना मास्क, एस.टी.चे दार उघडे ठेवून प्रवास वादाच्या भोवऱ्यात ; काय आहे प्रकरण वाचा बातमी सविस्तर



खासदार,आमदार दापत्यांचा विना मास्क, एस.टी.चे दार उघडे ठेवून प्रवास वादाच्या भोवऱ्यात ; काय आहे प्रकरण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्स्पप्रेस न्युज


मेळघाट : नवनीत राणा आणि रवी राणा यांनी  शुक्रवारी परतवाडा ते धारणी असा 90 किमीचा प्रवास एसटी बसने करून आदिवासी बंधू भगिनींच्या वेदना जाणून घेतल्या होत्या. परंतु यावेळी त्यांनी विना मास्क व एस.टी.बसचे दार उघडे देवून प्रवास केल्याने त्यांचा हा प्रवास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समाजमाध्यामातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.


'मुंबईत एसी बस चालतात आणि मेळघाटात 25 वर्षे  जुन्या भंगार बसेस चालविल्या जातात. हा आदिवासींच्या जीवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप  प्रवास होईल, अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी' अशी मागणी खासदार नवणीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'च्या बाहेर निघून आदिवासींचं दुःख समजून घ्यावे, अशी ही विनंतीही केली आहे.परंतु, एसटी बसने प्रवास करत असताना राणा दाम्पत्याने मास्कचा वापर केलाच नाही. एवढेच नाहीतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 90 किमीच्या बस प्रवासामध्येही कुठेही मास्कचा वापर केला नसल्याचे समोर आले.


प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्यासाठी नवनीत राणा या बसच्या दारातच उभ्या होत्या. धावत्या बसच्या दारात उभं राहुन नवनीत राणा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली होती. धावत्या बसच्या दारात उभं राहून प्रवास करणे धोकादायक तर आहेच, त्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पण, तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत प्रवास करून इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास केला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies