माणदेशी फाउंडेशच्या कोविड हॉस्पिटलचे दिनांक २७ रोजी उद्घाटन ; विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

माणदेशी फाउंडेशच्या कोविड हॉस्पिटलचे दिनांक २७ रोजी उद्घाटन ; विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थितीमाणदेशी फाउंडेशच्या कोविड हॉस्पिटलचे दिनांक २७ रोजी उद्घाटन ; विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती 

माणदेश एक्सप्रेस टीम
म्हसवड/अहमद मुल्ला : एचएसबीसी बँक व सिपला फाउंडेशनच्या यांच्या आर्थिक सहयोगातून माणदेशी फाउंडेशनचे वतीने गोंदवले खुर्द येथे सर्व वैद्यकिय साधने व बेडसह उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घघाटन मंगळवारी ( ता.२७) दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी दिली.

सदरचा उद्घाटन समारंभ विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांचे अध्यक्षतेखाली व  खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, एचएसबीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेंद्र रोशा, जिल्हा सातारा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गोवाडा, माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

माण-खटाव तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोवीड बाधित रुग्णांची स्थानिक पातळीवर तातडीने मोफत उपचाराची सुविधा होणेसाठी माणदेशी फाउंडेशनने गोंदवले खुर्द येथे हे कोविड सेंटर उभारलेले आहे. या हॉस्पिटलमध्ये चार व्हॅटिलेटर, २२ ऑक्सिजन बेड, सीआर सिस्टीम, एक्स रे मशीन, एअर कंडिशनर, मॉनिटर, ४४ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर इत्यादी वैद्यकिय साधनांच्या सुविधा बरोबरच रुग्णावर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी माणदेशीने नियुक्त केलेले आहेत.


यापुर्वीही माणदेशीने सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी एचएसबीसी बँकच्या सहयोगातून २८ फिलिप्स कंपनीचे व्हॅटिलेट, तीनशे बेड तसेच मायणी येथील कोविड हॉस्पिटलसाठीही तीस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे योगदान दिलेले आहे.
याबरोबरच सातारा दिल्ह्यात वीस हजार कुटुंबाना १४ वस्तूंचा समावेश असलेली जेवणाची पाकिटे,२४ हजार कुटुंबाना अन्न पाकिटे,पाच हजार पीपीई किट्स दोन हजार लिटर सॅनेटायझर, मास्क, कोविड बाधित उपचारातील रुग्णास अंडी, मोसंबी, खजूर वाटपाचा उपक्रम राबविला असल्याचे श्रीमती सिन्हा यांनी सांगितले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise