मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 27, 2020

मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

  मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी 


नवी दिल्ली : मराठा आरक्षणाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होत आहे. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी स्थगितीचा आदेश देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी आहे.


 यात शैक्षिणक प्रवेश प्रक्रिया आणि नोकरी भरती प्रक्रियेतील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तर गायकवाड कमिटीचा रिपोर्ट न पाहता न्यायालयाने स्थगिती दिली. तर गायकवाड कमिटीचा अहवाल महाराष्ट्र सरकारचे वकील न्यायालयात वाचून दाखवणार आहे.  


यावर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडले आहेत. इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेऊन मराठा आरक्षणावर स्थगिती दिली होती. मात्र तो खटला मागासवर्गीय आरक्षणाबाबत होता, तर मराठा आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास हा नवा प्रवर्ग तयार करून देण्यात असल्याचा मुद्दा विनोद पाटील यांच्यातर्फे मांडण्यात येणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise