Type Here to Get Search Results !

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले उद्या दिनांक २२ रोजी आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर ; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी



केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले उद्या दिनांक २२ रोजी आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर ; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी  

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले हे उद्या दिनांक २२ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आल्याची माहिती आटपाडी तालुका आरपीआयचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली. आहे.  


कोरोना महामारीच्या संकटात असताना तालुक्यात ओल्या दुष्काळाची भर पडली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर सर्वच घटक उध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीच्या आपत्तीत सापडलेल्यांची भेट घेऊन त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी केंद्रिय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले हे गुरुवार दि. 22 रोजी पंढरपूर तसेच आटपाडी तालुक्यातील दिघंची गावाला भेट देणार आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies