Type Here to Get Search Results !

माण तालुक्यातील “या” गावातील प्रसिद्ध देवांच्या यात्रा रद्द



माण तालुक्यातील “या” गावातील प्रसिद्ध देवांच्या यात्रा रद्द 

माणदेश एक्सप्रेस टीम   


म्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान भोजलिंग, वडजलची वडजाईदेवी, शेनवडीचा म्हस्कोबा, पुकळेवाडीचा सिदोबा या गावातील सालाबादप्रमाणे होणाऱ्या यात्रा कोविड 19 च्या महामारीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती म्हसवड पोलिस ठाण्याचे प्रभारी  सपोनि महेश भावीकट्टी यांनी दिली.  


माण तालुक्यातील जांभुळणी, वळई, विरळी येथील  लाखो भाविक भक्तांचे श्रध्दांस्थान  भोजलिंग, वडजलची वडजाईदेवी, शेनवडी येथील म्हस्कोबा तर पुकळेवाडीचा सिदोबा या देवी देवतांच्या यात्रा साला बाद प्रमाणे दसरा सणा दिवशी होणार होत्या. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या आदेशान्वये  14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधी पर्यंत सर्व सार्वजनिक, धार्मिक सण, उत्सव, यात्रा साजरा न करणे बाबत मनाई आदेश असलेने म्हसवड पोलिस ठाण्याचे प्रभारी  सपोनि महेश भावीकट्टी यांनी जांभुळणी येथे भोजलिंग मंदिरा मध्ये मानकरी व पुजारी व विविध गावचे आजी, माजी सरपंच यांची बैठक घेऊन यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे प्रमुख जिल्हाधिकारी यांनी  यात्रा न करणे बाबत आदेश दिले असल्याची माहिती देऊन कोरोनाच्या संकटात यात्रा का रद्द करव्यात या बाबत मार्गदर्शन केले.




याबाबत सर्व मानकरी व पुजारी यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  25 व 26 रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुजारी भारत काळेल, बाबा श्रीमती काळेल, अॅड. सिध्दार्थ काळेल, पोकॉ अभिजीत भादुले, पालिस नाईक किरण चव्हाण, जांभुळणीचे पोलिस पाटील सुभाष काळेल, वळईचे पोलिस पाटील दादा आटपाडकर, पोलिस पाटील घुटुकडे, सरपंच प्रशांत गोरड, बबन काळेल आदि उपस्थित होते.


तर शेनवडी येथील म्हस्कोबा देवाची वडजल येथील वडजाईदेवीची व पुकळेवाडी येथील सिदोबाची यात्रा कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव कमी व्हावा या उद्देशाने रद्द् करण्यात आल्याची माहिती पत्राव्दारे कळविली असून वरील चार गावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या असून भाविक भक्तांनी या वर्षी यात्रेसाठी उपस्थित राहू नये असे आवाहन यात्रा कमिटींच्या वतीने करण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies