कुरकुंभ एमआयडीसीत लागलेली आग चार तासात आटोक्यात ; कोणतीही जीवितहानी नाही - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

कुरकुंभ एमआयडीसीत लागलेली आग चार तासात आटोक्यात ; कोणतीही जीवितहानी नाहीकुरकुंभ एमआयडीसीत लागलेली आग चार तासात आटोक्यात ; कोणतीही जीवितहानी नाही  


कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील शिवशक्ती ऑक्सलेट या कंपनीत बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागून मोठा स्फोट होऊन परिसर हादरला होता. तसेच परिसरात आगीचे लोण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल होत शर्थीच्या प्रयत्नानंतर तब्बल चार तासानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  


शिवशक्ती ऑक्सलेट या कंपनीत रात्री पावणेदोनच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीच्या घटनेवेळी 10 ते 12 कामगार आत काम करत होते. यावेळी वेळीच प्रसंगावधान दाखवून या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.


तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise