अनुराग कश्यप हाजीर हो... मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाठविली नोटीस - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

अनुराग कश्यप हाजीर हो... मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाठविली नोटीसअनुराग कश्यप हाजीर हो... मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाठविली नोटीस

 

मुंबई : अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर अनुरागवर गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनुरागला नोटीस पाठविले असून, त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.  


आज, गुरुवारी सकाळी 11 वाजता त्याला वर्सीवा पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार असल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनुरागने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारवाई करा. तेव्हाच या माणसाचे खरे रूप समोर येईल. या ट्विटमुळे माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असे म्हणत पायल हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती.  


तर केंद्रीय मंत्री डॉ.रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी पायलची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांनी अनुरागविरोधात कारवाईची मागणी केली होती. माझ्या अशिलावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे केलेले आरोप चुकीचे आहेत. महिलांवर होणारे अत्याचार समोर यावेत यासाठी सुरू झालेली 'मी टू चळवळ' स्वत:च्या सोयीप्रमाणे स्वार्थासाठी वापरली जात आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीचे चारित्र्यहनन होत आहे, असे अनुरागच्या वकिलांनी मत व्यक्त केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
1 comment:

Advertise