निजामपूर व हणमंतगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची सभापती राणीताई कोळवले यांनी केली पाहणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

निजामपूर व हणमंतगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची सभापती राणीताई कोळवले यांनी केली पाहणीनिजामपूर व हणमंतगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची  सभापती राणीताई कोळवले यांनी केली पाहणी

माणदेश एक्सप्रेस टीम  


अजनाळे/सचिन धांडोरे : निजामपूर व हणमंतगाव या भागात मुसळधार पडलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतीपिके, फळबागा व नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आली असून महसूल प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी सांगोल्याच्या सभापती राणीताई कोळवले यांनी केली आहे.  


गुरुवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी सभापती  राणीताई कोळवले  यांनी निजामपुर व हणमंतगावला भेट देऊन हणमंतगाव येथील आप्पासो सुतार, सीताबाई खांडेकर, भिवा पाटील, अशोक वाघमारे, इंदाबाई खांडेकर, संतोष खांडेकर, बाबुराव टाकळे यांच्या  पडझड झालेल्या  घराची पाहणी करून  तात्काळ शासनाकडून  आर्थिक मदत  मिळवून देण्याच्या दृष्टीने  प्रयत्न केला जाईल असा  विश्वास दिला. अनेकांची घरे उध्वस्त झाल्यामुळे  संसार उघड्यावर आले आहेत. घरातील जीवनावश्यक वस्तू देखील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने अनेक कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


निजामपूर येथील शेतकरी विलास कोकरे, काकासाहेब कोकरे, रावसाहेब कोकरे, सुभाष माने, नारायण माने, यांच्यासह सह अन्य शेतकऱ्यांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची व पिकांची पाहणी केली पाहणी केली. तर तात्काळ पंचनामा करून त्यांना मदत करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाणार असल्याच्या त्या म्हणाल्या. गेल्या महिन्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातील सर्वच गावांमध्ये शेतीपिकांसह व  घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त झालेल्या सर्वच भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी यावेळी सभापती राणीताई कोळवले यांनी केली. याप्रसंगी  पंचायत समिती सदस्य नारायण जगताप, सचिव विठ्ठलराव शिंदे, बंडू शिंगाडे, लघु पाटबंधारे अभियंता श्री. लांडगे यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise