IPL 2020 : चेन्नई-हैदराबाद संघांमध्ये आज लढत ; कोण मारणार बाजी? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

IPL 2020 : चेन्नई-हैदराबाद संघांमध्ये आज लढत ; कोण मारणार बाजी?IPL 2020 : चेन्नई-हैदराबाद संघांमध्ये आज लढत ; कोण मारणार बाजी?


दुबई : चेन्नई सुपर किंग्ज व सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज लढत आहे. मुंबई विरोधात विजय मिळवून आयपीएल 2020 सीजनची सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला मागील दोन सामन्यात सलग पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल (डीसी) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) विरोधात चेईन्न पराभूत झाली.


दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबाद (SRH) आपल्या मागच्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) विरोधात 15 धावांनी विजय मिळवला आहे. याआधी हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चँलेंजर्स बँगलोर (RCB) विरोधात हार पत्करावी लागली आहे. एकीकडे सनरायजर्स विजयी घोडदौड करण्यास उत्सुक आहेत. तर चेन्नई पुन्हा विजय मिळवून आपली गाडी रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आहे.


आजची मॅच दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. हैदराबादचं नेतृत्व डेविड वॉर्नर करणार आहे तर चेन्नईची धुरा एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. त्यामुळे या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.


  • सनरायजर्स हैदराबादची संभावित संघ
  • डेविड वार्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो (विकेटकिपर), मनीष पांडे, केन विलियमसन, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि खलील अहमद/सिद्धार्थ कौल


  • चेन्नई सुपर किंग्ज संघ :
  • महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, शेन वाटसन, शार्दूल ठाकुर, अंबाती रायडू, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, दीपक चहर, लुंगी एनगिडी, मिशेल सँटनर, केएम. आसिफ, नारायण जगदीशन, मोनू कुमार, ऋतूराज गायकवाड, आर. साई किशोर, जोश हेजलवुड, सॅम कुरैन


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise