आटपाडीतील तालुक्यातील रस्ते कामात ठेकेदाराची बनवा-बनवी ; पुलाच्या कामातील पितळ ही उघड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 15, 2020

आटपाडीतील तालुक्यातील रस्ते कामात ठेकेदाराची बनवा-बनवी ; पुलाच्या कामातील पितळ ही उघडआटपाडीतील तालुक्यातील रस्ते कामात ठेकेदाराची बनवा-बनवी ; पुलाच्या कामातील पितळ ही उघड 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचले आहे. अनेक गाव ओढ्यावरील पुल ही वाहून गेले आहेत. त्यामुळे रस्त्याची कामे करताना ठेकेदाराने बनवा-बनवी केल्याचे उघड झाले असून रस्त्यावरील पुलाच्या कामातील पितळ ही पावसाने उघड झाले आहे.


आटपाडी तालुक्यातून जाणारा दिघंची-हेरवाड राज्यमार्गाचे काम काही ठिकाणी झाले असून अजून ही काही ठिकाणी चालू आहे. गेले दोन दिवस झालेल्या पावसाने तालुक्यातील रस्त्यांना निकृष्ठ कामामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले असून खचले आहेत. याच मार्गावती असणाऱ्या छोट्या ओढ्यावरील व नाल्यावरील पुलांच्या कामात ठेकेदाराने केलेली बनवेगिरी उघड झाली आहे. दिघंची-आटपाडी राज्य मार्गावरील जाधव महाराज यांच्या मठाशेजारी लहान पुल आहे. या ठिकाणी ठेकेदाराने पुलाच्या संपूर्ण दुरुस्ती करणे आवश्यक असताना या ठिकाणी सुरुवातीला मोठी पाईप वापरली आहे व पुलाच्या शेवटच्या ठिकाणी ही मोठी पाईप वापरली आहे.
परंतु रस्त्याच्या मध्यभागी मात्र पाईप लहान असल्याने पाणी वेगाने पुढे सरकत नसल्याने येथून जादा होणारे पाणी जाधव महाराज यांच्या वैकुंठ भवन या मठामध्ये शिरल्याने सदर मठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्याच्या कामावेळी फक्त पुलांची दुरुस्ती केली असून सुरुवातीला व शेवटी मोठ्या पाईप वापरल्या असून मध्यभागी मात्र पाईप लहान ठेवल्याने प्रशासनाची फसवणूक केली आहे.  


याबाबत दिघंची-हेरवाड या राज्य मार्गावर असणाऱ्या सर्व लहान पुलांचे काम पुन्हा करून त्याठिकाणीच्या असणाऱ्या लहान पाईप काढून त्या ठिकाणी मोठ्या पाईप टाकाव्यात अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिला आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise