Type Here to Get Search Results !

रणजी क्रिकेटपटू रणजित चव्हाण यांची स्वेरी कॅम्पसला सदिच्छा भेट



रणजी क्रिकेटपटू रणजित चव्हाण यांची स्वेरी कॅम्पसला सदिच्छा भेट

माणदेश एक्सप्रेस टीम


पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला प्रसिद्ध क्रिकेटपटू रणजित चव्हाण व इतर मान्यवरांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी मध्ये विविध नवनवीन  उपक्रम सुरू असतात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर स्वेरी कॅम्पसला वरचेवर भेट देत असतात. क्रिकेटपटू रणजित चव्हाण यांनी लंडन येथे क्रिकेट कोचिंग केलेले आहे. त्यांच्यासोबत ग्राउंड कुरेटर नागेश शेलार हे ही उपस्थित होते.



 

कॅम्पस भेटी दरम्यान त्यांनी स्वेरीच्या साडेपाच एकर जागेतील भव्य क्रीडांगणास आवर्जून भेट दिली. स्वेरीचे क्रीडांगण आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. स्वेरीच्या क्रीडांगणावर एक भव्य स्टेडियम बनवले जाऊ शकते असे या मान्यवरांनी प्रतिपादन केले. तसेच स्वेरीच्या शैक्षणिक वाटचालीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती क्रिकेट अकॅडमी, पंढरपूरचे रवी निंबाळकर, पंढरपूर तालुका पोलीसस्टेशनचे शिवाजी पाटील व सचिन तांबीले तसेच स्वेरीचे कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील, क्रीडा समन्वयक प्रा. रामेश्वर सोळगे आदी मान्यवर उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies