अजनाळे गावात ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा रंगू लागली ; सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 18, 2020

अजनाळे गावात ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा रंगू लागली ; सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणारअजनाळे गावात ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा रंगू लागली ; सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणार

माणदेश एक्सप्रेस टीम


अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता,सांगोला, जि.सोलापूर ग्रामपंचायत मधील सरपंच पदाची मुदत ११ नोव्हेंबर रोजी मुदत संपत असल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. वार्डातील आरक्षण जाहीर झाले असले तरीही सरपंच पदाचे आरक्षण अद्याप पर्यंत जाहीर झाले नसल्यामुळे राजकीय हालचालींना म्हणावा तसा वेग आलेला दिसत नाही. पण इच्छुक मंडळींनी आपापल्या वार्डात छुप्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली असून नेते मंडळींनी वार्डामध्ये उमेदवारी कुणाला द्यायची याची चाचपणी केली आहे.


इच्छुक उमेदवारांनी नेतेमंडळी कडे आपल्या नावाची फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे नेतेमंडळी मतदार राज्याच्या अडी-अडचणी विचारून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही नेतेमंडळींनी घरोघरी जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. कधी नव्हे वाड्या-वस्त्याकडे फिरणारे नेतेमंडळी वस्तीवर आल्यामुळे मतदार राजाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  
अद्यापर्यंत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर झालेल्या नसल्यामुळे म्हणावा तसा ग्रामपंचायत निवडणूक राजकीय रंग आला नाही त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण कधी जाहीर होणार? याकडे राजकीय नेते मंडळीसह मतदार राजाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षण सोडती नंतरच येथील राजकीय समीकरणे वेग घेणार असून तेव्हाच मोर्चेबांधणीला खरी सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु वाड्या-वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, असे एक ना अनेक प्रश्न, वर्षानुवर्ष दिलेली पोकळ आश्वासने या प्रश्नाकडे नेतेमंडळी लक्ष देणार का? गावातील पाटील मळा, शेंबडे मळा, या मळ्यामध्ये जाऊन काही राजकीय नेते मंडळींनी गाठीभेटी घेणे सुरुवात केली आहे तर काही नेतेमंडळींनी फोनद्वारे माहिती घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडण्यास सुरुवात केली आहे.


अजनाळे ग्रामपंचायतीची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष अशी दूरंगी निवडणूक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येणाऱ्या एक-दोन महिन्यांमध्ये येथील राजकीय समीकरणे वेग घेणार हे मात्र नक्की. अनेक वार्डा मध्ये बदल झाल्यामुळे नेतेमंडळींने अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे पण गावातील सुज्ञ मतदार  पुढाऱ्यांना त्यांची जागा निश्चित दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे. नोव्हेंबर महिन्यात अजनाळे ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्यामुळे नवीन सरपंच कोण विराजमान होणार? कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise