मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार

 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार


मुबंई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मंदिरे सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते.


त्या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर दिलं होते तर शरद पवार यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.
त्यात कोळी बांधव, डबेवाले, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात काही शिष्टमंडळे आणि अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise