वाळू तस्करांचा मंडल अधिकारी व तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 28, 2020

वाळू तस्करांचा मंडल अधिकारी व तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्नवाळू तस्करांचा मंडल अधिकारी व तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न 

माणदेश एक्सप्रेस टीम  आटपाडी/प्रतिनिधी : वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकारी व तलाठी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न  करण्यात आला असून सदरची घटना ही आटपाडी तालुक्यातील खटकाळे मळा येथे घडली आहे. याबाबत आटपाडी पोलिसात मंडल अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळू तस्कर उदय देशमुख, गंड्या देशमुख व एका अनोळखी अशा तीन जणांवर भा दं वि कलम ३५३, ३०७, ३७९, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
याबाबत अधिक माहिती अशी की, खटकाळे मळा येथून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती आटपाडी तहसीलदार यांना मिळाली. त्यांनी याबाबत मंडल अधिकारी पांडुरंग कोळी यांना कारवाई करण्याची सूचना दिली. खटकाळे मळा येथे तलाठी माळी यांना घेऊन गेल्यानंतर वाळूने भरलेली ट्रॉली व ट्रॅक्टर चिखलात अडकलेला दिसला. अधिकाऱ्यांना पाहतच चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. त्यानंतर ट्रॅक्टर मालक उदय देशमुख हा घटनास्थळी पोहोचला. त्याला तहसील कार्यालय ट्रॅक्टर घेऊन येण्यास सांगितले त्याने, अधिकाऱ्यांना दमदाटी केली “ट्रॅक्टरला आडवे आल्यास याद राखा असे, म्हणत त्याने ट्रॅक्टर अंगावर घालण्यास प्रयत्न केला”  यावेळी स्वतःचा जीव वाचवताना मंडळ अधिकारी व तलाठी रस्त्यावर पडून जखमी झाले.
यानंतर काही वेळाने गंड्या देशमुख याने दुचाकी अंगावर घालून मंडल अधिकारी व तलाठी यांना मारण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून वाळू तस्करा विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून. याबाबत उपविभागीय अधिकारी अंकुश इंगळे यांनी आटपाडी पोलीस ठाणेस भेट दिली असून तपासाच्या दृष्टीने पुढील सूचना केल्या आहेत. आटपाडी तालुक्यात वाळू तस्करी जोरात सुरू आहे. वाळू माफिया शिरजोर झाले असून शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना जीवे मारण्यापर्यंत तस्कर निर्ढावले असल्याने वाळू माफियांचा बंदोबस्त पोलीस कसे करतात याकडे आटपाडीकरांचे लक्ष वेधले आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise