Type Here to Get Search Results !

हाथरस घटनेवरुन राज ठाकरे आक्रमक ; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?



हाथरस घटनेवरुन राज ठाकरे आक्रमक ; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?


मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात काही झालं की स्वत:ला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? असा सवाल विचारत राज यांनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.


राज यांची पोस्ट

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?

बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?

महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करुन त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीत. त्यांना का जाब विचारला जात नाहीये?

हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies