शिवसेना आमदाराची ’दबंगगिरी’, थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

शिवसेना आमदाराची ’दबंगगिरी’, थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ

 


शिवसेना आमदाराची ’दबंगगिरी’, थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ


जळगाव : राज्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट  येत्या 5 ऑॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, राज्यात अद्याप ’देऊळ बंद’च आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांची दंबगगिरी समोर आली आहे. आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कोरोनाच्या काळात थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ केला आहे.


बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर शासनाच्या नियमानुसार बंद आहे. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला. एवढंच नाही तर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लवकर कोरोनामूक्त होण्यासाठी आमदार पाटील यांनी पूजापाठ केला.  


राज्यात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. बोडवड तालुल्यातील शिरसाळा हनुमान मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असताना सत्ताधारी पक्षाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी शिरसाळा हनुमान मंदिर उघडून राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाच्या विळख्यातून लवकर सुटका होऊ दे, यायासाठी पूजाअर्चा केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise