मंत्री जयंत पाटील यांना अश्रु अनावर... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 18, 2020

मंत्री जयंत पाटील यांना अश्रु अनावर...


 

मंत्री जयंत पाटील यांना अश्रु अनावर...

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात भावूक होताना दिसले. आपल्या जवळच्या लोकांच्या अकाली निधनामुळे जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना गहिवरून आले.


राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असताना अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले. जयंत पाटील म्हणाले की, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच लोक आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख होत आहे.  
कोरोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे.वाय.पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक जयंतरावांनीही या कालखंडात गमावले आहे. महाराष्ट्रात राजकारणात लोकांमध्ये वावरणारा नेता म्हणून जयंतरावांची ओळख आहे. आपल्या जवळच्या माणसांचे अशारीतीने जाण्यामुळे जयंतरावांना मोठे दुःख झाले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise