Type Here to Get Search Results !

मायणी कोविड हॉस्पिटलला माणदेशी फौंडेशनकडून ऑक्सिजनचे ५० जम्बो सिलेंडरची मदत



मायणी कोविड हॉस्पिटलला माणदेशी फौंडेशनकडून ऑक्सिजनचे ५० जम्बो सिलेंडरची मदत

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद मुल्ला : सध्याच्या कोविड या संसर्गजन्य विषाणूच्या काळात म्हसवड येथील माणदेशी फौंडेशन जिह्यातील विविध रुग्णालयास वेळोवेळी सर्वाधिक सुमारे एक कोटी ८० लाख रुपये खर्चाची वैद्यकिय साधनांची मदत केली आहे. मायणी येथीलही कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनचे ५० जम्बो सिलेंडर दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.


इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅन्ड रिसर्च सेंटर मायणी मधील कोविड हॉस्पिटलसाठी माणदेशी फौंडेशनने रुग्णांसाठी मोफत दिलेल्या जम्बो ऑक्सिजन सिलेंडर निमित्त माणदेशी फौंडेशनचे आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅन्ड रिसर्च सेंटर मायणीचे संस्थापक अध्यक्ष एम.आर. देशमुख, संचालिका श्रीमती साळुंखे, कोविड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. खाडे.इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.




आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या साथीचे रुग्ण वाढू लागताच आम्ही शासनाच्या मदतीची प्रतिक्षा न करता मायणी येथे प्रथम स्वतंत्र ५० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरु केले त्यानंतर पुन्हा आवश्यक्तेनुसार बेडची संख्या वाढवत आज अखेर ८५ केली आहे. उपचारासाठी रुग्णांस ऑक्सिजनची नितांत गरज भासत होती परंतु त्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर पुरेशा संख्येने उपलब्धच होत नव्हते. माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा व प्रभात सिन्हा यांचे समोर हि समस्या मांडताच त्यांनी तातडीने ५० जम्बो सिलेंडर देण्याचे मान्य केले व त्यापैकी आज रोजी ३० सिलेंडर हॉस्पिटल मध्ये पोहचही केलेत. माणदेशीने तातडीने सिलेंडरची मदत केल्यामुळे याचा फायदा निश्चितच कोविड रुग्णांस होईल व त्यांचे प्राणही वाचतील. आमच्या मायणीच्या कोविड हॉस्पिटल मध्ये सुमारे पाचशेहून अधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. येथील कोविड हॉस्पिटल मध्ये उपचारात रुग्ण मृत्यूची संख्याही नगण्यच आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी यांचे योगदान मोठे राहिल्यामुळेच हे शक्य झाले. कोविड रुग्णासाठी सरकारकडून अद्यापही एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचा खुलासाही श्री.गोरे यांनी यावेळी केला.


प्रभात सिन्हा म्हणाले की, कोरोनाचे साथीचे संकट येताच माणदेशी फौंडेशनने इतर लोकउपयोगी उपक्रमापेक्षा कोविड साथीवर उपाय योजनेवरच लक्ष केंद्रीत केले. पुणे येथील ससुन, सातारा येथील कोविड जम्बो हॉस्पिटल तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातही सुमारे ४५ लाख रुपये किमतीचे कोविडसाठी वैद्यकिय साधनांची मदत केलेली आहे. सातारा येथे पाच हजार व  म्हसवड  कोविड रुग्ण तपासणीसाठी दोन हजार किट मोफत उपलब्ध करुन दिलेत. वेळोवेळी भरीव अशी मदत माणदेशी फाउंडेशनने केलेली आहे. माण तालुक्यातील क्वारंन्टाईन सेंटर मधील कोविड रुग्णास मोसंबी, खजूर व उकडलेली अंडी असा पोषक आहार प्रत्येक रुग्णास आठवडाभर देण्यात आलेला आहे.


मायणी येथील हॉस्पिटलसाठी तातडीने ३० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत व आणखी दोन व्हेंटिलेटर बेड देत आहोत. यापुढेही आणखी निश्चितच मदत केली जाईल. कोविडच्या साथीत माणदेशीने सुमारे दोन कोटी ८२ लाखाहून अधिक खर्च सेवाभावीवृतीने केलेला असुन भविष्यातही कोविड साथीचा मुकाबला करण्यास माणदेशी फौंडेशन सक्रिय राहिल असे आश्वासन प्रभात सिन्हा यांनी दिले.  


यावेळी आर.एम देशमुख यांनीही कोविड हॉस्पिटल साठी माणदेशी फौंडेशनने जम्बो ऑक्सीजन सिलेंडर तातडीने दिले बद्दल  व आणखी दोन व्हेंटिलेटर बेड देण्याचे योगदान माणदेशी फौंडेशन देणार असल्यामुळे माणदेशीचे आभार मानले.



माण तालुक्यातील गोंदवले येथे माणदेशी फौंडेशनने पन्नास लाख रुपये खर्च करुन कोविड हॉस्पिटल उभारत असुन त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व वैद्यकिय साधनेयुक्त हे कोविड हॉस्पिटल असणार असुन माण-खटाव मधील कोविड रुग्णांस मोफत उपचार उपलब्ध होतील.

प्रभात सिन्हा


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies