लाखो रुपयांचे काम, लाखो रुपयांची दुरुस्ती ; सगळ पाण्यात ; ओलेकर वस्ती साठवण तलावाची व्यथा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 12, 2020

लाखो रुपयांचे काम, लाखो रुपयांची दुरुस्ती ; सगळ पाण्यात ; ओलेकर वस्ती साठवण तलावाची व्यथा

ओलेकर वस्ती साठवण तलाव


लाखो रुपयांचे काम, लाखो रुपयांची दुरुस्ती ; सगळ पाण्यात ; ओलेकर वस्ती साठवण तलावाची व्यथा

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/आटपाडी : लाखो रुपयांचे काम, लाखो रुपयांची दुरुस्ती अन करोडो रुपये पाण्यात अशी काहीशी गत मिटकी गावाअंतर्गत येणाऱ्या ओलेकर वस्ती साठवण तलावाची झाली आहे.


आटपाडी तालुक्यातील मिटकी गावाअंतर्गत येणाऱ्या व मिटकी ते कामथ गावाच्या दरम्यान ओलेकर वस्ती आहे. याठिकाणी प्रशासनाच्या वतीने २००२ साली साठवण तलाव मंजूर होवून काम सुरु झाले व ते थांबले. परंतु २०१९ साली तलावाचे काम पूर्ण झाले. तलावामध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणी येत असल्याने तलाव भरून पाणी तलावाच्या सांडव्यावरून वाहत असे. या तलावामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा ही झाला.


परंतु पालकमंत्री जयंत पाटील यांनी पुराचे वाहून जाणारे पाणी टेंभू, म्हैशाळ या उपसा जलसिंचन योजनेद्वारे दुष्काळी भागाला सोडण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सदरच्या योजना चालू झाल्यावर टेंभू उपसा जलसिंचन योजना ही सुरु झाली व तालुक्यात पाऊस कमी व पाणी जास्त वाहू लागले. पाऊस नाही पडला तरी तालुक्यात तलाव टेंभू योजनेच्या पाण्याने भरण्यात येवू लागले.


ओलेकर वस्ती साठवण तलाव हा गेली कित्येक महिने टेंभूच्या पाण्याने भरला होता. त्यामुळे सांडव्यातून पाणी वाहत होते. काल झालेल्या पावसाने तलावाच्या वरील भागात असणारे अनेक लहान-मोठे शेतीनाला बांध फुटल्याने तलावात प्रमाणापेक्षा जादा पाणी येण्यास सुरुवात झाली. तलाव अगोदरच भरला असल्याने व येणारे पाणी जादा असल्याने पाणी तलावाच्या सांडव्यात सुद्धा पाणी बसत नव्हते. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला. पाणी तलावाच्या मुख्य भिंती वरून वाहू लागल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे तलावाची मुख्य भिंत खचू लागली व तलावास मोठे भगदाड पडले व तलावात असणारे पाणी व पावसाचे पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहू लागले. हेच पाणी आटपाडी तलावामध्ये आल्याने आटपाडीच्या शुक्र ओढ्याला मोठा पूर आल्याने व पाणी ओढ्याच्या पात्राच्या बाहेर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise