दिघंचीत राहत्या घरातून २५ हजार रुपयांची रोकड लंपास - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 12, 2020

दिघंचीत राहत्या घरातून २५ हजार रुपयांची रोकड लंपासदिघंचीत राहत्या घरातून २५ हजार रुपयांची रोकड लंपास 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील राहत्या घरातून रोख २५ हजार रुपयांची चोरी झाली असून सदर घटनेचे नोंद आटपाडी पोलिसात ठाणे येथे झाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी नंदकुमार महादेव त्रिगुणे हे दिघंची येथे राहत असून दिनांक ११ च्या रात्री १० व दिनांक १२ च्या रात्री १ च्या दरम्यान राहत्या घराच्या लगत खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून त्या खोलीमध्ये प्रवेश करून हँगरला अडकविलेल्या पिशवी मधील चावी घेवून दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील रोख २५ हजाराची रोकड लंपास केली.


याबाबत आटपाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.स.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास सपोफौ चोरमुले हे करीत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise