Type Here to Get Search Results !

हिंगणीतील धाईंजे कुटुंबाला म्हसवड पोलिसांची मारहाण ; मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी बहुजन ब्रिगेड आक्रमक ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा



हिंगणीतील धाईंजे कुटुंबाला म्हसवड पोलिसांची मारहाण ; मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी बहुजन ब्रिगेड आक्रमक ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा 

माणदेश एक्सप्रेस टीम




सदाशिवनगर/वार्ताहर : हिंगणी ता. माण जि. सातारा येथील धाईंजे कुटुंबाला म्हसवड पोलीस ठाणेतील पोलीस कर्मचारी रवि डोईफोडे याने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी सदर पोलीसावर गुन्हा दाखल करावा अन्यथा दिनांक २/११/२०२० रोजी म्हसवड पोलीस ठाणे समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे साची ऋषिपाल बनसोडे यांनी दिला असून याबाबत म्हसवड पोलीस ठाणे यांचे निवेदन देण्यात आले आहे. 





याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २१/१०/२०२० रोजी रात्री ११ वाजता शंकर महादेव धाईंजे व त्याची पत्नी  सोनाली शंकर धाईंजे (रा. हिंगणी ता. माण जि.सातारा) यांची आपापसात घरघुती भांडण झाले असता पत्नी सोनाली हिने शंकर महादेव धाईंजे, सासु वंदना महादेव धाईंजे व सासरे महादेव दाजी धाईंजे या तिघांवर म्हसवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.





याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारा पोलीस शिपाई रवी डोईफोडे यांनी धाईंजे कुंटुंबीयांची बाजु ऐकता घेता शंकर महादेव धाईंजे यास मारहाण चालु केली. त्यामध्ये शंकरची आई वंदना धाईंजे साहेब मुलाला का मारताय असे विचारताच, रवी डोईफोडे या पोलीस शिपायाने जातीवाचक शिव्या दिल्या  व शंकरचे वडील महादेव धांईंजे यांचे खिसे तपासुन ५००० रूपयांची मागणी केली.




त्यामुळे अशा बेजबाबदार व जातीवाद करणाऱ्या रवी डोईफोडे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करावा, अन्यथा दिनांक २/११/२०२० रोजी म्हसवड पोलीस ठाणे समोर बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून याबाबतचे निवेदन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.




Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies