स्विफ्ट गाडीची दोन मोटारसायकलला धडक ; तीन जखमी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 27, 2020

स्विफ्ट गाडीची दोन मोटारसायकलला धडक ; तीन जखमी
स्विफ्ट गाडीची दोन मोटारसायकलला धडक ; तीन जखमी  
आटपाडी/प्रतिनिधी : मुलाणकी ता.आटपाडी, जि. सांगली येथे स्विफ्ट गाडीने दोन मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.

गंभीर जखमींना सांगलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातामध्ये बाळासाहेब रामचंद्र जाधव रा. जुनोनी ता.सांगोला, जि. सोलापूर व त्याची पत्नी सारिका हे दांपत्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगली येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले.
मंगलनाथ महिपतराव देशमुख रा. आटपाडी याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी क्रमांक  एम.एच. 04 7797  या गाडीने मोटरसायकल क्रमांक एम.एच. 10 7797 वरील बाळासाहेब जाधव व सारीका यांना तसेच बुलेट क्रमांक एम.एच. 10 बी झेड 1263 ला जोरदार धडक दिली.
सदरचा अपघात साडेपाच वाजता आटपाडी सांगोला रस्त्यावरील मुलाणकीजवळ घडला. स्विफ्ट डिझायर ही सांगोला रस्त्याने आटपाडीत येत होती, तर मोटरसायकलस्वार आटपाडी हून माडगुळे कडे चालले होते. या अपघाताची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise