घोषवाक्य स्पर्थेत “या” विद्यार्थिनीने मिळविले देशपातळीवर घवघवीत यश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 6, 2020

घोषवाक्य स्पर्थेत “या” विद्यार्थिनीने मिळविले देशपातळीवर घवघवीत यश

कु.अक्षता चंद्रकांत खटके

घोषवाक्य स्पर्थेत “या” विद्यार्थिनीने मिळविले देशपातळीवर घवघवीत यश

माणदेश एक्सप्रेस टीम

म्हसवड/अहमद मुल्ला : माणदेश इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर म्हसवड कॉलेजची विद्यार्थीनी कु.अक्षता चंद्रकांत खटके हिने देशपातळीवर घोषवाक्य स्पर्थेत घवघवीत यश मिळविले.


शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, ओतूर पुणे यांनी जागतिक औषध निर्माण शास्त्र या दिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावर शब्दकोश स्पर्धा आयोजीत केली होती. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी रत्नागिरी यांनी आयोजीत केलेल्या घोषवाक्य या स्पर्धेमध्ये भारतातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  


या स्पर्धेमधून माणदेश इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर म्हसवड या महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. अक्षता चंद्रकांत खटके हिने प्रथम क्रमांक फटकवला. या महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.व्ही.एस.माने, संस्थापक सचिव प्रा. डी. डी. कोडलकर यांनी अभिनंदन केले तर प्राचार्य डॉ.बी. व्ही. उदुगडे व उपप्राचार्य बी.एन.बनगर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise