IPL 2020 : MI vs RR : मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स आज समोरासमोर ; रोहित शर्मा आणखी विक्रम मोडण्याची संधी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 6, 2020

IPL 2020 : MI vs RR : मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स आज समोरासमोर ; रोहित शर्मा आणखी विक्रम मोडण्याची संधीIPL 2020 : MI vs RR :  मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स आज समोरासमोर ; रोहित शर्मा आणखी विक्रम मोडण्याची संधी  


अबुधाबी : IPL 2020 च्या आजच्या २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात आज सामना रंगणार असून  मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्माला आणखी विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचपैकी 3 सामन्यांत विजय मिळवले आहेत आणि आज विजय मिळवून पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत आणि विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असली तरी समोर राजस्थान रॉयल्सची तगडी टीम आहे हे विसरून चालणार नाही.


या सामन्यात मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्मा आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. आज त्याने अर्धशतक केल्यास तो सुरेश रैनाचा IPLमधील सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडणार आहे. या दोघांच्या नावावर प्रत्येकी 38 अर्धशतकं आहेत. IPL मध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारा तो भारतीय खेळाडू बनेल. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 131 सामन्यांत 45 अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रोहितचाच क्रमांक येतो.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise