पुण्यात खास. उदयनराजेंकडून यांच्या नेतृत्त्वात होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 30, 2020

पुण्यात खास. उदयनराजेंकडून यांच्या नेतृत्त्वात होणारी मराठा आरक्षण परिषद रद्दपुण्यात खास. उदयनराजेंकडून यांच्या नेतृत्त्वात होणारी मराठा आरक्षण परिषद रद् द 


पुणे : खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्त्वात आज पुण्यामध्ये होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी या परिषदेचं आयोजन केलं होतं. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला याचिकाकर्ते, अभ्यासक, विधीतज्ज्ञांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते.

आज दुपारी दोन वाजता या परिषदेचं आयोजन पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी खासदार उदयनराजेंसोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणारे वकील, याचिकाकर्ते, अभ्यासक उपस्थित राहणार होते. या परिषदेत मराठा आरक्षणाची पुढिल लढाई कोणत्या पद्धतीनं लढायची याची दिशा निश्चित करण्यात येणार होती. मात्र, अचानक या बैठकीसाठी ज्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, त्या सर्व मान्यवरांना आजची परिषद रद्द करण्यात आल्याचा निरोप पाठवण्यात आला. अचानक बैठक का रद्द करण्यात आली यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकतेली नाही.  No comments:

Post a Comment

Advertise