सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आटपाडी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 30, 2020

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आटपाडी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट




सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आटपाडी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट 

माणदेश एक्सप्रेस टीम  



आटपाडी : राज्याचे सहकार व पणन मंत्री  बाळासाहेब पाटील यांनी  आटपाडी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी आटपाडी येथे अद्यावत भाजी मंडई करण्यासंदर्भात तसेच आठवडा, शेळ्या मेंढ्याचा बाजारा करीता शेडची मागणी कामी त्यांना निवेदन दिले या मागणीबाबत लवकरच सकरात्मक भूमिका घेण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.  





यावेळी माजी जि. प. सदस्य तानाजीराव पाटील, ॲड. धनंजय पाटील, आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज भोसले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गोसावी, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, उपसरपंच अंकुश केाळेकर, आटपाडी ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, चंद्रकांत हाके, प्रदीप लांडगे, उमाकांत देशमुख, शिवशक्ती आईस फॅक्टरी चे मालक दादासाहेब उर्फ आबासाहेब पाटील, सिध्दनाथ केबलचे मालक बाळासाहेब उर्फ सुरेश पाटील,  दिघंची ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, मुन्नाभाई तांबोळी, युवा सेना अध्यक्ष संतोष पुजारी, इंजिनिअर राजेश नांगरे, इंजिनिअर राजाभाऊ राजमाने, मनोज नांगरे (कारभारी), कल्याण काळे, सुहास देशमुख, आप्पासो  पाटील,  दौलत चव्हाण-पाटील, संतोष पाटील, अभिजीत ऐवळे, सचिन ऐवळे, सचिन सपाटे, अमोल सरगर, मनोज देशपांडे, सुखदेव पाटील, मझहर तांबोळी  आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Advertise