श्री जकाईदरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची हर्षवर्धन देशमुख यांनी केली पाहणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 31, 2020

श्री जकाईदरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची हर्षवर्धन देशमुख यांनी केली पाहणीश्री जकाईदरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची हर्षवर्धन देशमुख यांनी केली पाहणी 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पुलांचे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गाव ओढ्यावरील अनेक पुल वाहून गेल्याने याचा मोठा परिमाण वाहतुकीवर झाला.


 तालुक्यातील खरसुंडी परीसरात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची पाहणी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख यांनी ठिकठिकाणी फिरून पहाणी केली. यावेळी त्यांनी खरसुंडी येथील श्री जकाई दरा मंदिराकडे जाणारा रस्ताची पहाणी करुन शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा  करून तत्काळ पंचायत समितीचे अधिकारी यांना रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या पहाणी दौऱ्यावेळी आटपाडी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, युवा नेते राहुल गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise