भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडून प्रणव गुरव यांच्या कामाची प्रशंसा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 1, 2020

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडून प्रणव गुरव यांच्या कामाची प्रशंसाभाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडून प्रणव गुरव यांच्या कामाची प्रशंसा

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आटपाडी तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रणव गुरव यांच्या कामाची प्रशंसा केली असून त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले आहे.


आटपाडी तालुका युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी काम करीत असताना प्रणव गुरव यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी समाजापयोगी विविध कामे केलेली आहेत. तसेच दिघंची सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला असून खासदार संजयकाका पाटील व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या माध्यमातून कामे केली आहेत.  

दिनांक ३१/१०/२०२० रोजी भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असताना प्रणव गुरव यांनी पलूस येथे त्यांचे  स्वागत तसेच सन्मान केला. त्याचबरोबर भाजप युवा मोर्चा आटपाडी तालुका अध्यक्ष या नात्याने आतापर्यंत त्यांनी केलेली कामे, विविध राबवलेली उपक्रमे, सामाजिक उपक्रमे या सर्वांचा लेखाजोखा, कामाचा आढावा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील, जगन्नाथ बाबा पाटील, जिल्हा प्रभारी प्रविण फोंडे, यांच्याकडे सुपूर्द केला.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise