गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन : मोदींनी व्यक्त केल दु:ख - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन : मोदींनी व्यक्त केल दु:ख


 गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन : मोदींनी व्यक्त केल दु:ख


 अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते.त्यांच्यावर अहमदाबादमधील एका दवाखान्यात उपचार सुरू होते. केशुभाई यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं, "जनसंघ आणि भाजपला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातभर प्रवास केला. त्यांनी आणीबाणीचा प्रखर विरोध केला. शेतकरी कल्याणाचे प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचे होते. ते आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री कुठल्याही पदावर असले तरी ते शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवत असत."


"केशुभाईंनी माझ्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं. प्रत्येकालाच त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला. त्यांच्या निधनानं एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानं आपण सर्वजण दु:खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे," असंही मोदींनी म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


2 comments:

  1. भावपुर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  2. भावपुर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete

Advertise