आटपाडी तालुक्यातील आयकर भरणारे १५४८ नागरिक "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने" साठी अपात्र ; मिळालेले पैसे शासनास जमा करावे लागणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

आटपाडी तालुक्यातील आयकर भरणारे १५४८ नागरिक "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने" साठी अपात्र ; मिळालेले पैसे शासनास जमा करावे लागणारआटपाडी तालुक्यातील आयकर भरणारे  १५४८ नागरिक "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने" साठी अपात्र ; मिळालेले पैसे शासनास जमा करावे लागणार 

माणदेश एक्सप्रेस टीम  
 सांगली : सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 4 लाख 58 हजार 190 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या लाभार्थ्यांपैकी 1 हजार 660 अपात्र लाभार्थी व 12 हजार 607 आयकर भरणारे अपात्र लाभार्थी यांची यादी शासनाकडून पोर्टलवर प्राप्त झाली आहे. ज्या अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थी यांना सदरची रक्कम तात्काळ शासनास जमा करावी लागणार आहे.


या योजनेंतर्गत 1 हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 89 लाख 54 हजार तसेच 12 हजार 607 आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रूपये रक्कम जमा झालेली आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील १४ अपात्र लाभार्थी यांचे ६८ हजार रुपये तर आयकर भरणाऱ्या १५४८ नागरिकांचे 1 कोटी 24 लाख 84 हजार रूपये शासनास जमा करावे लागणार आहेत. संबंधिताकडून तात्काळ रक्कम वसूल करण्यासाठी तालुकास्तरावर सूचना देण्यात आल्या असून तालुकास्तरावर अपात्र लाभार्थींना नोटीस काढण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise