अतिवृष्टीमुळे बलवडी येथील बंधारा फुटला - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 16, 2020

अतिवृष्टीमुळे बलवडी येथील बंधारा फुटला

 


अतिवृष्टीमुळे बलवडी येथील बंधारा फुटला 

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगोला : परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला आहे. गावोगावी ओढे, नाले वाहून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.


दरम्यान सांगोला तालुक्यातील बलवडी येथे मोठा बंधारा आहे. सदरचा बंधारा गेली दोन वर्ष झाले सलग दुसऱ्या वर्षी भरलेला असून १३ आणि १४ ऑक्टोंबरला परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बलवडी येथील बंधारा तुडुंब भरल्याने बंधारा फुटून पाणी वाहू लागले आहे. दरम्यान पावसाने विश्रांती दिल्याने ही बातमी समजताच गावकऱ्यानी हि दृश्ये पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise