आटपाडी तालुक्यात पावसाने काल विश्रांती दिल्याने ओढ्यांचे पाणी कमी होवू लागले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 16, 2020

आटपाडी तालुक्यात पावसाने काल विश्रांती दिल्याने ओढ्यांचे पाणी कमी होवू लागलेआटपाडी तालुक्यात पावसाने काल विश्रांती दिल्याने ओढ्यांचे पाणी कमी होवू लागले 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात काल थोडी पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आज आणि उद्या अजूनही हवामान वेध शाळेने पावसाचे ‘भाकीत’ केल्याने थोडी भिती सुद्धा आहे.
विशेषत: आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने या भागातून वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी थोड्याफार प्रमाण कमी झाले असले तरी अजून ही सर्व ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच याच भागातून पाणी मोठ्या प्रमाणात आटपाडीच्या तलावामध्ये येत असल्याने शुक्र ओढ्याला अजून ही मोठ्या प्रमाणात पाणी असून आटपाडीच्या बाजार पटांगण येथील पुलावर पाणी कमी झाले आहे.  

पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजून ही माण नदीवरील लिंगीवरे, कौठूळी, पिंपरी खुर्द येथील पूल पाण्याखाली आहेत. गळवेवाडी व आवळाई येथील गाव ओढ्यावरील पूल ही अजून पर्यंत पुलावरील पाणी कमी जाले आहे. गोमेवाडी व हिवतड येथील गाव ओढ्यावरील पूल ही पाण्याखाली असून या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.  

दिघंची येथील ढोलेमळा येथील ओढ्यावरील पूलच्या शेजारी रस्ता वाहून गेला आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रस्ते व पूल वाहून गेले होते काही खचले होते त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु यातील काही रस्ते व पूल पुन्हा वाहून गेले आहेत.   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise