केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक : आठवले यांचे पंतप्रधानांना पत्र - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक : आठवले यांचे पंतप्रधानांना पत्र

 


केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक : आठवले यांचे पंतप्रधानांना पत्र 

मुंबई - आता केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना  केंद्र सरकारने मदत करावी, अशी विनंती आठवले यांनी पंतप्रधानांना केली आहे.


आठवले  यांनी नुकताच  अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंनाही मागण्यांचे पत्र पाठवले, आहे.  राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेली मदत  तुटपुंजी असून, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत मिळण्याची गरज आहे.  

त्यासाठी आठवले  यांनी पंतप्रधानांना पत्र  पाठवले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे पिकांच मोठं नुकसान झालं. शेतात पाणी, चिखल साचल्याने  पुढचा रब्बीचा हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी, शेतमजूर संकटात आहे. राज्यसरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. असे आठवले यांनी या पत्रात म्हटले आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज  
No comments:

Post a Comment

Advertise