शिवसेना आमदाराकडून नियमांची पायमल्ली ; आमदारासहित 40 जणांविरुद्ध गुन्हा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

शिवसेना आमदाराकडून नियमांची पायमल्ली ; आमदारासहित 40 जणांविरुद्ध गुन्हाशिवसेना आमदाराकडून नियमांची पायमल्ली ; आमदारासहित 40 जणांविरुद्ध गुन्हा


हिंगोली : तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी काढला. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो. या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंना पालखीतून फिरवले जाते. मंदिरातून निघालेली पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोनं लुटण्यासाठी ही पालखी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडाची सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते.


यावर्षी पालखीचा हा सोहळा कोरोनामुळं रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी ही पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले होते. मात्र सत्ताधारी आमदारांकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याने हिंगोली जिल्ह्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ मंदिरात सपत्नीक नागनाथाची पूजा केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise